येत्या काळात सर्वपक्षीय नेत्यांकडून ‘टेंपल रन’चा खेळ चालवला जाईल…
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 06 August 2018
  • पडघम देशकारण 'सेक्युलॅरिझम Secularism टेंपल रन Temple Run मंदिर Temple मशीद Masjid हिंदू-मुस्लीम Hindu-Muslim

येत्या काळात राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. सत्ताकांक्षी राजकीय समूहातील सत्तास्पर्धा एवढाच अर्थ या घडामोडींना असतो. आधीचे सरकार जाऊन नवे सरकार सत्तेवर येणार, एवढ्या मोजक्या शब्दांत त्याचे वर्णन करता येते. या राजकीय प्रक्रियेतील परिवर्तनामुळे आपल्या आयुष्यात तसूभरही फरक पडणार नसतो, हे सत्य आता जनतेला ज्ञात झालेले आहे. अर्धशतकाहून अधिक काळचा अनुभव गाठीशी असलेल्या भारतीयांना आणखी भ्रमित करण्यात काय हशील आहे?

यातला चर्चेचा मुद्दा हा की, त्यानिमित्त सर्व राजकीय घटकांकडून 'सेक्युलॅरिझम' या संकल्पनेची वाताहात करण्याची स्पर्धा पाहावयास मिळणार आहे. या दोन्ही राज्यांतील धार्मिक श्रद्धास्थळांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत, ही यातली समाधानाची बाब आहे.

धर्म आणि राज्यसंस्था परस्परांपासून भिन्न असतात. या दोन्हींचा परस्परांशी कसलाच संबंध नसतो. किंबहुना या दोहोंनी परस्परांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करू नये, या हेतूने ही संकल्पना रूढ करण्यात आलेली आहे. जगाच्या इतिहासातील विविध टप्प्यांतले बारकावे तपासल्यास ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असल्याचे जाणवते. राजकीय घटक ज्यांना मतदार संबोधतात, ती जनता आणि एक व्यापक जनसमुदाय या अर्थाने खरोखरीच सेक्युलर असतो. त्याला शांततापूर्वक सहअस्तित्व कोणी मुद्दाम शिकवण्याची गरज भासत नाही. तो आपापल्या श्रद्धांची आपापल्यापुरती जोपासना करून समाधानाने जगत असतो.

राजस्थान, मध्य प्रदेशही याला अपवाद नाही. पण आता या दोन्ही राज्यांत निवडणुका होणार असल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांकडून जो ‘टेंपल रन’चा खेळ चालवला जाईल. त्याने हा समूह विचलीत होऊ शकतो. तटस्थ जनसमुदायास धर्माच्या, जातीभावनेच्या प्रवाहात वाहवत जाण्यास प्रवृत्त केल्याशिवाय कुठल्याच राजकीय पक्षास निवडणूक जिंकता येत नाही, हेच भारतीय लोकशाहीचे नागडे सत्य आहे का? या दोन्ही राज्यांतील समस्या, त्यांच्या निवारणासाठी विविध पक्षांनी केलेले संकल्प,  त्या-त्या राज्यातल्या मतदारांच्या आशा-अपेक्षांचे प्रतिबिंब असलेले जाहीरनामे अधिक प्रकाशझोतात येण्याऐवजी भलत्याच गोष्टी समोर येतात.

एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रचारमोहिमेचा शुभारंभ कोणत्या मंदिरातून करणार, तर दुसऱ्या पक्षाचा प्रमुख प्रचारमोहिमेचा नारळ कुठल्या देवतेच्या साक्षीने वाढवणार याचा साद्यंत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गत सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी राजकीय पक्षांनी प्रचारफेऱ्यांदरम्यान सर्व धार्मिकस्थळे आपापसांत अगदी सामंजस्याने वाटून घेतली आहेत.

राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीत आता आधुनिकता व सफाईदारपणा आला आहे. प्रचारमोहिमांचे स्वरूप पालटले आहे. पण निवडणुकांना आणि मतदात्याला सामोरे जाण्यापूर्वी त्यांच्या समस्या काय आहेत? व त्यांची सोडवणूक कशी करायची? याच्या प्रामाणिक प्रतिपादनासाठी ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे आलेली चमकदार सादरीकरणाची अक्कल हुशारी आणि व्यवस्थापन कौशल्य वापरले असते तर किमान सत्ताधारी व सत्ताकांक्षी पक्षाच्या अर्धचाणक्यांच्या तावडीतून धार्मिक श्रद्धास्थाने बचावली असती. राजकीय पक्षांकडून त्यांचा सत्ताप्राप्तीचा कंडू शमवण्यासाठी सेक्युलॅरिझम या उदात्त संकल्पनेशी वर्षानुवर्षांपासून होणारी छेडछाड थांबावी, या हेतूने तरी सर्वधर्मीय मतदारांनी या राजकीय घटकांना आवर घालायला हवा.

किमान या राजकीय पक्षांनी येत्या काळात स्वत:हून त्यांची अध्यात्माची ओढ किती खरी, किती खोटी? याचा कबुलीजबाब द्यायला हवा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या प्राचिन काळापासून चालत आलेल्या जीवनशैलीतील चार पुरुषार्थ जगण्याचा प्रयत्न इथल्या मातीतला प्रत्येक जण करतोच आहे, त्याला अन्य धर्म ज्ञात नाही पण केवळ सत्तेच्या माध्यमातून अर्थप्राप्तीसाठी काही घटक त्याला त्याच्या मूळ धर्मापासून का परावृत्त करतात?  हा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे, नसेल तर तो अवश्य पडायला हवा. 

अवघ्या विश्वकल्याणाचे पसायदान आणि संत कबिराचे दोघे गुणगुणत मानवधर्म जगणाऱ्या सर्वधर्मीय जनसामान्यांच्या मनातल्या अस्मिता जागवण्याचे पाप का केल्या जात आहे? या शेकोटीवर स्वत:च्या पोळ्या भाजण्याचे प्रताप थांबवायला हवेत.  कारण एरवी केवळ प्रामाणिक श्रद्धावानांकडूनच पायधूळ झाडल्या जाणाऱ्या व भग्नावस्थेत असलेल्या मंदिरांची अचानक होणारी रंगरंगोटी त्याला अस्वस्थ्य करत असणार! 

‘जाहिद शराब पिने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह बता जहाँ खुदा नही है’ या अवघ्या दोन ओळींत भूतलावरच्या प्रत्येकाचा धर्म व नीतिमत्ता सांगणाऱ्या मिर्झा गालिब यांचा मतितार्थ आपल्या राजकीय प्रक्रियेतील भागीदारांना कधीच समजणार नाही का? या दोन्ही राज्यांतल्या प्रचारमोहिमांमुळे गल्लोगल्लीचे वातावरण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे होईल. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील व जनतेची महिनाभर करमणूकही होईल. पण रखरखीत वाळवंटात व दररोजच्या भाऊगर्दीत एकाकी अवस्थेतील आमच्या मंदिर-मस्जिदींना प्रतीक्षा असेल पुन्हा ‘अच्छे दिन’ येण्याची, पुन्हा नव्या निवडणुकीची!

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

 

Post Comment

vishal pawar

Mon , 06 August 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......