उन्मादाच्या विरोधात एक कविता
पडघम - साहित्यिक
प्रयाग शुक्ल
  • हिंदीतील मान्यवर कवी, कथाकार, समीक्षक प्रयाग शुक्ल आणि ‘काव्यपर्व’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Thu , 07 September 2017
  • पडघम साहित्यिक प्रयाग शुक्ल Prayag Shukla निरंजन उजगरे Niranjan Ujagare काव्यपर्व Kavyaparva

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर जो उन्माद कालपासून उधाणला आहे, त्या उन्मादाच्या विरोधात ही कविता आहे. उन्माद हा नदीच्या पुरासारखा असतो. तो फार काळ टिकत नाही. टिकूच शकत नाही. एका निर्भिड पत्रकाराच्या हत्येचं निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांच्या उन्मादाचंही तसंच होईल. नक्की होईल. तो आशावाद बुलंद करणारी ही कविता आहे... उन्मादाच्या विरोधातली...

.............................................................................................................................................

उन्माद फार काळ टिकत नाही,

हेच लक्षण असतं उन्मादाचं,

बीजांना, झाडांना, पानांना उन्माद नसतो.

असतो वावटळीला-

पण तीसुद्धा फार काळ टिकत नाही.

जेव्हा आपण उन्मादात असतो

तेव्हा पाहू शकत नाही फुलांचे रंग,

ते असतात तसे.

नदीचा उन्माद ओसरून जातो –

पण तो, जो पाहतो

त्याला उन्माद होत नाही.

तसा समुद्राला उन्माद असतो

पण तो नेहमीच उन्मादात नसतो

सूर्य आणि चंद्राला नसतो उन्माद

असतं ते ग्रहण.

जे उन्मादात असतील,

त्याला समजू शकणार नाहीत ह्या ओळी,

प्रतीक्षेत राहील ही कविता

हा उन्माद ओसरून जाण्याच्या.

(‘काव्यपर्व’ या निरंजन उजगरे यांनी संपादित व अनुवादित केलेल्या आणि मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या संग्रहातून साभार)

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Ravi

Wed , 13 September 2017

मस्त सर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......