ह्या फ्लेक्सनी शहराचा गळा आवळला असा असा की…
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
आनंद शितोळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 01 August 2017
  • पडघम कोमविप फ्लेक्स Flex Banner

फ्लेक्समुळे शहर विद्रूप होत असेल म्हणून तक्रारी येत असतील तर, त्यातील किती तक्रारी बेकायदेशीर फलकाबद्दल असतात आणि किती कायदेशीर फलकाबद्दल असतात?
या फ्लेक्सबाज लोकांनी एक मॉडेल विकसित केलेलं आहे.

ते शहरात जाहिराती करायला वेगवेगळ्या व्यावसायिक जाहिरात एजन्सीकडून जागा भाड्यानं घेतात. 
जाहिरात एजन्सी जागामालकाशी करार करून लोखंडी सांगाडे उभे करून पालिकेला कर भरतात. 
करार केल्याप्रमाणे व्यावसायिक आपली जाहिरात करणारे फ्लेक्स लावतात. या जाहिरातींचे दर साईटचं लोकेशन, साईज यावर अवलंबून असतात. वर्षाला दोन दोन लाख रुपये भरूनही साईट भाड्यानं घेतल्या जातात.

मग आमच्या काका, दादा, मामा, भैय्या, भाऊ, नाना आणि त्यांच्या चिरगुट कार्यकर्त्यांनी वाढदिवस आणि वेगवेगळ्या फुटकळ निवडी इत्यादी कामासाठी फ्लेक्स तयार करून घ्यायचे. 
मग या आधीच जाहिराती लावलेल्या फ्लेक्सवर आपले फ्लेक्स लावून टाकायचे.

सिंपल.

बरं मग व्यावसायिक तक्रार करतात का? 
अजिबात करत नाहीत. 
कारण जर तक्रार केली तर त्या फ्लेक्सवरचे सगळे भीतीदायक चेहरे थेट दुकानात येतात, काचांशी खेळतात, दुकानातल्या वस्तूंशी खेळतात आणि प्रेमाने समजावून सांगून निघून जातात! 
त्या नुकसानापेक्षा गप्प बसलेलं परवडतं.

जाहिरात एजन्सी तक्रार करते का? 
अजिबात तक्रार करत नाही. 
कारण तक्रार केली तर त्या फ्लेक्सवर पुन्हा जाहिरातीचा फ्लेक्स लावला की, तो रात्रीतून फाडून फेकून दिला जातो. 
धंदा करायचा की, तक्रारी करायच्या? पाण्यात राहून माशाशी वैर?

मग नागरिकांनी तक्रार केली तर पालिका छापील उत्तर देते, ‘सदर जागेचा करार करून पालिकेचा कर भरून जाहिरातीची जागा भाड्यानं घेतलेली आहे, सबब कारवाई करता येणार नाही.’ 
विषय संपला.

हा उद्योग करणारा वर्ग असतो त्याला आमदार किंवा गेलाबाजार नगरसेवकाचा वरदहस्त असतोच.

त्यामुळे व्यावसायिक किंवा जाहिरात एजन्सीला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो.

यापेक्षा वाईट असतात ते चिरगुट होऊ घातलेले नेते किंवा युवा नेते.

चार बांबूचा सांगाडा चौकात नाहीतर रस्त्याच्या कडेला किंवा खाजगी जागेवर उभा करायचा, त्यावर जेमतेम ओळखू येतील इतक्या आकारात किमान २५-३० फोटो लावायचे. असा त्या भागातला २५-३० जणांचा ग्रुप असला तर आठवड्याला एकाचा वाढदिवस असतोच. झालंच तर गणपती, नवरात्र, राष्ट्रीय सण असतात.

मग असा बेकायदेशीर लावलेला लाकडी सांगाडा आणि त्यावर आठवड्याला बदलणारे फ्लेक्स हे चक्र सुरू होतं.

२५-३० जणांनी वर्गणी करून फ्लेक्स लावला तर फारसा खर्च येत नाही आणि आलटून-पालटून प्रत्येकाला एकदा संधी मिळतेच मुख्य फोटोत येण्याची!

ही हौस भागवून घेणारी, प्रसिद्धीचा कंड शमवून घेणारी फळी साधारण १५-१८ वर्षांपासून २५-३० वयाच्या गटातली असते.

मोठे आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या निवडीबाबत असणारे फ्लेक्स एकवेळ समजू शकतो, पण या वाढदिवसाच्या फलकामागे नेमकं असतं तरी काय?

या फ्लेक्सवर झळकणारे बहुतांशी चेहरे रिकामटेकडे असतात किंवा शिक्षण अर्धवट सोडलेले असतात (किरकोळ अपवाद). उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी फुटकळ उद्योग चालू असतात. काही कायदेशीर, काही बेकायदेशीर हेही ओघानं आलंच.

मग अशा उद्योगांना संरक्षण, भांडवल पुरवणं यासाठी स्थानिक पातळीवर असलेला सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेता कामाला येतो. स्थानिक पातळीवर पक्ष, पक्षनिष्ठा, विचारसरणी या बाबी अतिशय गौण असतात. आर्थिक-राजकीय हितसंबंध जपायला नेते मंडळी नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसतात.

त्या बदल्यात त्या नेत्याला कार्यकर्ते नावाची फौज कुठल्याही समारंभात गर्दी म्हणूनही वापरता येते आणि वेळोवेळी शक्तीप्रदर्शन करायला उपयोगाला येते.

आणि हे शक्तीप्रदर्शन नुसतं राजकीय नसतं तर बऱ्याचदा ते व्यावसायिक स्वरूपाचंही असतं.

राजकीय नेते जमिनीच्या व्यवहारात अशा पाळलेल्या फौजेला घरं मोकळी करणं, भाडेकरू पळवून लावणं इथपासून स्थानिक विरोधकांना समजावून सांगणं अशी विविध कामं करवून घेतात.

असा हा दोन्ही बाजूनं फायद्याचा सौदा सुखनैव चालू राहतो.

परिणामी फ्लेक्समुळे तुम्ही-आम्ही कितीही वैतागत असलो आणि शहर विद्रूप होतंय म्हणून बोंबा मारत असलो तरीही हे चालूच राहणार हे नक्की!

akshitole@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......